काळ आला होता पण वेळ आली नव्हती! या म्हणी प्रमाणे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे
सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता, पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही. याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. मात्र काहीजण मृत्यूच्या दारातून माघारी येतात.हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
पहा व्हिडिओ
काळ आला होता पण वेळ आली नव्हती!
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती लाँड्रीमध्ये येतो आणि कपडे घेतो.कपड्यांच्या दोन ते तीन पिशव्या त्याच्या हातात आहेत. या पिशव्या घेऊन तो व्यक्ती लाँड्रीच्या बाहेर जाण्यासाठी निघतो मात्र दोन्ही हातात पिशव्या असल्यानं त्याला दरवाजा उघडण्यास अडचण येते. यावेळी तो पायानं दरवाजा उघडतो आणि बाहेर पडतो. त्याच क्षणी लाँड्रीच्या आतमध्ये एका वॉशिंग मशीनचा भयानक स्फोट होतो आणि संपूर्ण लाँड्रीमध्ये आग लागते. तो व्यक्ती लाँड्रीच्या बाहेर पडायला आणि स्फोट व्हायला अशी परिस्थिती होते आणि व्यक्ती या अपघातातून थोडक्यात बचावतो.
हे देखील वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






