निंभोरा प्रतिनिधी
परमानंद शेलोडे
????पत्रकार कमलाकर माळी यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युनियर चार्ली चॅम्पलिन समाजसेवक सुमीत पंडीत यांनी सतर्क रहाण्याचे केले आवाहन
रावेर :- तालुक्यातील मोठे वाघोदा येथील रहिवासी तथा पत्रकार व समाजसेवक कमलाकर माळी हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीना काही उपक्रम राबवत असतात आतापर्यंत त्यांनी रक्तदान शिबीर ग्रामस्वच्छता अभियान ग्रामस्थांसाठी स्वखर्चाने वाचन कट्टा असे विविध उपक्रम राबवले आहेत. वाचन यावर्षी त्यांनी बसस्टाॕप परीसरात ग्रामस्थांसाठी ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमित पंडित,यांच्या मुक अभिनयातून विविध गाण्यांतून जनतेस सावधान हा उपक्रम राबवला.चोरी, मारामारी,चैन स्नँकींग ,पाॅकेट मारी, दुचाकी चार चाकी चोरी यापासुन सतर्क कसे राहावे याची जनजागृती केली प्रथम चार्ली समाजसेवक सुमीत पंडीत यांच्या हस्ते बस स्टँडवर असलेल्या आम्ही वाघोदेकर वाचन कट्ट्याला पुष्पहार करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात झाली सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या अफवा सोशल मीडिया द्वारे पसरविण्यात येत आहे. तरी अश्या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवु नये, कोणत्याही सोशल मीडियातील अथवा फोन वर विश्वास ठेवू नये ,सर्वदुर शहरात ग्रामीण भागात घरफोड्या,दरोडे,दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या दुचाक्यांना जी.पी.आर.एस सिस्टीम किंवा लोखंडी साखळी,आपल्या गाड्यांना बसवावे,व रोकड,बॅंकेत ठेवा पैशांची आवश्यकता असल्यास शक्यतो आँनलाईन व्यवहाराला सावधानता बाळगून प्राधान्य द्या,आपल्या मोबाइलचा पासवर्ड कोणालाही देऊ नका,ऑनलाईन व्यवहार करताना स्वतःची खबरदारी अशी जनजागृती यावेळी करण्यात आली अशा उपक्रम मुळे कमलाकर माळी यांचे कौतुक होत आहे
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






