Viral Video : मुंबई :- दोन तरुणी आणि एक तरुण धोकादायक बाईक स्टंट करताना दिसत असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. मुंबई पोलिसांनी स्टंट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ज्यामध्ये एक मुलगा हेल्मेटशिवाय आणखी दोन मुलींसोबत बाइक स्टंट करताना दिसत आहे.या प्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे. या व्हिडिओतील व्यक्तींबद्दल कुणाला काही माहिती असेल तर तुम्ही थेट आम्हाला माहिती देऊ शकता, असं आवाहन करण्यात आलं आहे.पोथोल वॉरियर्स फाऊंडेशनने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “धोकादायक स्टंट ज्यामध्ये 2 मागे बसलेआहेत, हेल्मेट नाही. यातील तरुणांना केवळ दंडच नाही तर आरोपींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असून त्यांना कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याच एफआयआरमध्ये त्यांच्यावर भादंविकलम 114 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






