जळगाव : कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या मुलाने वडीलांजवळ जीवन संपून टाकावे असा विचार येतो म्हणून वडली येथे एकाच कुटुंबातील तीन जणांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज (६ एप्रिल) सकाळी घडली.यात पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तर मुलगा आणि आईची प्रकृती गंभीर असून दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे.वडली (ता. जळगाव) गावात नारायण दंगल पाटील (वय ६६) हे पत्नी भारती पाटील (वय ५५) आणि मुलगा गणेश पाटील (वय ३३) यांच्यासोबत वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील कुटुंबीय तणावात होते. यात आज (६ एप्रिल) सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान नारायण पाटील त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील यांनी तिघांनी घरात असतांना विषारी औषध सेवन केले.
मित्राला फोन करून बोलावले
अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावातील मित्र श्यामला फोन करून घरी येण्याचे सांगितले. श्याम तेथे आल्यावर आई- वडीलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर तिघांना खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. नारायण पाटील यांचा उपचारादरम्यान सकाळी अकराच्या सुमारास मृत्यू झाला.
तर पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. तिघांनी अचानकपणे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






