अकोला : रेल्वेतून प्रवास करत असताना सावधान राहणे आवश्यक आहे. धावती रेल्वे पकडण्याचे धाडस, कधी करायचे नसते, अन्यथा अपघात होण्याची शक्यता असते. अकोलो रेल्वे स्थानकावर (Railway) अशीच एक घटना घडली.या अपघातात आई आणि मुलगी दोघांच्या जिवावर बेतले होते. परंतु स्थानकावरील लोकांनी धावत जाऊन मदत केल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओसमोर आला आहे, तो पाहिल्यावर तुम्हालाही हादरा बसणार आहे.
नेमके काय घडले-—
अकोला रेल्वे स्टेशनवर बुधवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. वाशिम येथील 42 वर्षीय बेबी खिलारे ही महिला मुंबईला जाण्यासाठी अकोला रेल्वे स्टेशनवर आली होती. त्यावेळी अमरावतीवरून मुंबईला जाणारी अंबा एक्स्प्रेस ही स्टेशनवरून निघाली होती. बेबी यांच्यांसोबत असणाऱ्या त्यांच्या मुलीने धावती ट्रेन पकडली. पण ही महिला ट्रेन पकडत असताना तिचा तोल गेला अन् पाय घसरून त्या प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकल्या. धावत्या रेल्वेसोबत त्या ओढल्या जाऊ लागल्या. तेवढ्यात स्टेशनवर व्हेंडर शंकर स्वर्गे यांनी धाव घेत त्या महिलेला ओढले. यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले.
मुलीवर आले संकट—
महिलेनंतर ट्रेनमध्ये चढलेल्या मुलीवर संकट कोसळले होते. आई खाली प्लॅटफॉर्म राहिल्यामुळे आणि तिचा अपघात पाहिल्यानंतर मुलीने ट्रेनमधून उडी घेतली. पण सुदैव चांगले होते, यामुळे तिलाही काही झाले नाही. या घटनेत आई व मुलीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. पण दोघींचेही प्राण वाचले. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. व्हेंडर शंकर स्वर्गे यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






