मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ मधील डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात रविवारी कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सवर तीन विकेट्स राखून विजय मिळविला. विजयासाठीचे २०५ धावांचे लक्ष्य कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित २० षटकांत ७ बाद २०७ धावा करीत साध्य केले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात वेंकटेश अय्यर (४० चेंडूंत ८३), कर्णधार नीतिश राणा (२९ चेंडूत ४५) आणि अखेरीस रिंकू सिंग (२१ चेंडूंत नाबाद ४८) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २९ धावांची आवश्यकता असताना रिंकू सिंगने यश दयालच्या शेवटच्या षटकात पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
शेवटच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज असताना रिंकूने षटकार लगायत विजय साकार केला. रिंकूला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच शेवटच्या षटकात धावांचा पाठलाग असा यशस्वी झाला. तुफानी फलंदाजी करताना रिंकू सिंगने एक चौकार आणि एकूण सहा षटकार लगावले. त्याआधी, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद २०४ धावा केल्या. शुभमन गिल (३१ चेंडूंत ३९), साई सुदर्शन (३८ चेंडूंत ५३), विजय शंकर (२४ चेंडूंत नाबाद ६३) यांनी दमदार फलंदाजी केली. कोलकाताच्या सुनील नरिनने ३३ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. गुजरातचा काळजीवाहू कर्णधार राशिद खानने आंद्र रसेल, सुनील नरिन आणि शार्दूल ठाकूरला बाद करत हॅट्रिक साकारली. त्याने ३७ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स मिळविल्या.
गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिकच्या जागी अष्टपैलू विजय शंकरचा समावेश करण्यात आला. नाणेफेकीनंतर बदली कर्णधार राशीद खानने सांगितले की, “हार्दिक थोडा आजारी आहे आणि संघ त्याच्यासोबत कोणतीही संधी घेऊ इच्छित नाही. “
आयपीएलमध्ये दोन हजार धावा पूर्ण करणारा शुभमन गिल दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. शुभमनने वयाच्या २३ वर्षे २१४ दिवसांत आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १३ धावा करून ही कामगिरी केली. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात २००० धावा करण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे. त्याने अवघ्या २३ वर्षे २७ दिवसांच्या वयात हा पराक्रम केला. यानंतर शुभमनने सर्वात कमी वयात २००० धावा पूर्ण करताना संजू सॅमसन, विराट कोहली आणि सुरेश रैना यांना मागे टाकले. शुभमनने आतापर्यंत ७६ सामने खेळले. त्याने २०१६ धावा केल्या. शुभमनने या लीगमध्ये १५ अर्धशतके झळकाविली. त्याने ५० षटकार आणि २०२ चौकार लगावले.
हे देखील वाचा
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.