जळगाव:- तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील ममुराबादमध्ये उघडकीस आलीय.जगदीश लक्ष्मण पाटील (वय ३३) असं मयत तरुणाचे नाव असून एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पाटील कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, जगदीश लक्ष्मण पाटील हा ममुराबाद येथे आई – वडीलांसह वास्तव्यास होता. जगदीश पाटील हा तरुण जळगाव शहरातील एमआयडीसीतील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. शनिवारी जगदीश हा कामवार गेला नाही. त्याचे आई वडील दोघेही कामानिमित्ताने घराबाहेर गेल्याने जगदीश हा घरी हा एकटाच होता. यादरम्यान त्याने त्याने राहत्या घरात पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
गळफास घेतलेल्या अवस्थेत जगदीशला पाहून आई – वडीलांना धक्काच बसला आणि त्यांनी हंबरडा फोडला. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पाटील कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जगदीश याचे काका यांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जगदीश याचे लग्न होत नसल्याने तो तणावात होता. याच कारणामुळे तो दारु पित होता. लग्नाच्या विचारातूनच जगदीश याने आत्महत्या केल्याचे जगदीशच्या काकांनी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






