जिल्ह्यातून 20 संघ सहभागी , आ चिमणराव पाटील यांची भेट.
एरंडोल (वार्ताहार )नगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या माझी वसुंधरा क्रिकेट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्हा भरातून नगरपालिके चे वीस संघांनी सहभागी झाले जनार्दन पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
आमदार चिमणराव पाटील यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन मुख्याधिकारी विकास नवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले व यांनी एरंडोल नगरपालिकेचे पद्वाभार स्वीकारल्या पासून विविध विकास कामांना गती मिळाली असून अनेक उपक्रम राबवित आहे सदर कार्यक्रमाला त्यांनी सदिच्छा दिल्या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले.
यांच्यासह भाजपाचे नेते किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, किशोर निंबाळकर , महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील हेही उपस्थित होते . यावेळी बोलताना विकास नवाळे ते म्हणाले की जिल्हाभरातून मिळालेला सहकार्य मुळेच सदर स्पर्धा यशस्वी करू शकलो व सर्व मुख्याधिकारी वृक्ष व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच प्रत्येक संघाला सन्मानपत्र देऊन त्यांचे स्वागत केले महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सदर स्पर्धा घेण्यात आल्या.
आजच्या रंगतदार सामन्यात एरंडोल नगरपालिका ब संघाने दमदार फलंदाजी करून सर्वाधिक धावा नोंदवल्या धम्ममा पैलवान त्याने उत्कृष्ट फलंदाजी करून एका ओव्हर मध्ये सहा षटकार मारून उपस्थितांची मने जिंकली के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सदर स्पर्धेमध्ये हजेरी लावून सर्वांना आकर्षित केले या ठिकाणी प्रत्यक्ष कार व चौकारांच्या मागे जोरदार अशा वाजंत्री ने स्वागत करण्यात आले .
मैदानात सर्वांचे आकर्षण म्हणून चे मुख्याधिकारी व प्रशासन विकास नवाळे हे मुख्य आकर्षण ठरले खेळाडूंना प्रोत्साहन देणे आलेल्या संघांचे स्वागत करणे मैदानावरील सर्व हालचालीं वर लक्ष व उत्तम प्रकारे नियोजन सह उत्कृष्ट पणे समालोचन करून सर्वांची मने जिंकली त्यांना सहकार्य जावेद मुजावर, बबलू परदेशी ,अनिल महाजन यांनी केले पंच म्हणूनआनंद दाभाडे, किरण पाटील यांनी काम पाहिले यावेळी सावदा किशोर चव्हाण,फैजपूर वैभव लोडे, भडगाव रवींद्र लोंढे चोपडा अविनाश गांगोडे पारोळा ज्योती भगत धरणगाव जनार्दन पवार मुख्याधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी शेंदुर्णी साजिद पिंजारी बोदवड आकाश डोईफोडे वरणगाव समीर शेख उपस्थित होते
स्पर्धा यशस्वितेसाठी मुख्याधिकारी विकास नवाळे, यांच्या सह बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे, अभियंता पंचबुद्धे, भट, बागडे अनिल महाजन,आनंद दाभाडे कार्यालयीन अधिक्षक हितेंद्र जोगी ,अशोक मोरे, तुषार पाटील ,वैभव पाटील , भूषण महाजन यांच्यासह सर्व नगरपालिकाअधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले