12वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
म्हसावद.तालुका जळगाव.स्वा.सै. पं. ध.थेपडे उच्च माध्यमिक विभागात दिनांक. 12 फेब्रुवारी 2022 रोजी इ.12वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.सदर कार्यक्रमाचे नियोजन इ.11वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जुनियर कॉलेज विभागप्रमुख श्री. योगराज चिंचोरे यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी प्राचार्य श्री सोनार सर, उपप्राचार्य श्री. बच्छाव सर , तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. भंगाळे सर होते. सोबतच व्यासपीठावर सर्व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. प्रथमता कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीमातेच्या प्रतिमापूजन व स्वागत गीताने झाली. तदनंतर इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले तसेच “अच्छा चलता हू” “हर घडी बदल रही है जिंदगी”तसेच मैत्रीवर गीत सादर करण्यात आलेत. श्री भंगाळे सर, श्री बच्छाव सर, श्री सोनार सर,यांनी कॉपीमुक्त अभियानचे विद्यार्थ्यांना आव्हान केले. श्री साळुंके सर, निलेश पवार सर, श्री पराग पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
श्री योगराज चिंचोरे सर यांनी अध्यक्षीय मनोगतात परीक्षेसाठी व भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता अकरावी विद्यार्थिनी कुमारी प्रियंका मराठे व कु.मानसी दुसाने तर प्रास्ताविक कु.कीर्ती चिंचोरे यांनी केले व आभार कु.क्रांती पाटील हिने व्यक्त केले. निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी केळीचे खांब तर विद्यार्थिनींनी फलक लेखन रांगोळ्या काढून शाळेच्या इमारतीची सुंदर सजावट केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.