उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये आपल्या बहिणीच्या घरी गेलेला पती जेव्हा घरी परत आला तेव्हा त्याने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहात पकडलं.या स्थितीत पकडल्यामुळे पत्नीने पतीवर हल्ला केला. इतकंच नाही तर तिच्या प्रियकराने त्याच्यावर गोळी झाडली. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही आणि त्याचा जीव वाचला.
पीडित राम सिंह याने पोलिसांना आपल्या तक्रारीत सांगितलं की, 18 फेब्रुवारी 2022 ला त्याचं लग्न उन्नाव जिल्ह्यातील पिंकीसोबत झालं होतं. लग्न झाल्यापासूनच पत्नीचं वागणं बरोबर नव्हतं. पण लोकांचा विचार करून त्याने हे कुणाला सांगितलं नाही. तरूण म्हणाला की, तो त्याच्या बहिणीच्या सासरी गेला होता. सकाळी जेव्हा परत आला तेव्हा त्याला दिसलं की, पत्नी तिचा प्रियकर दुर्गेश कुमार राठोडसोबत रोमान्स करत होती. पत्नीला या स्थितीत पाहून त्याने तिला रागावलं तर दोघेही घाबरले. ज्यानंतर पत्नीने माझ्यावर हल्ला केला.
इतकंच नाही तर तिच्या प्रियकराने माझ्यावर गोळीही झाडली. पण त्याचा नेम चुकला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घरात आले आणि त्यांनी दोघांना पकडलं.आजूबाजूच्या लोकांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिला आणि तिचा प्रियकर दुर्गेश कुमार राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
हे देखील वाचा
- Video: खळबळजनक! साखरपुडा सुरू वधू-वर दोघेही स्टेजवर तेवढ्यात एक युवती आली तिने नवरीला मिठी मारली अन् म्हणाली….. काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ
- मी’न्याय कुणाकडे मागायचा’ माझ्या पत्नीने सोडचिठ्ठी न देता केला दुसरा विवाह; म्हणत पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वतःला पेटवून घेतलं.
- 52 वर्षीय सासरा व त्याच्या मित्राने नवविवाहीत सुनेस १५ दिवस घरात डांबून ठेवत केला लैंगिक अत्याचार आरोपी सासरा व त्याच्या मित्र फरार.
- दोघांच्या प्रेमात ५ वर्षाच्या मुलगा होता अडथळा.! निर्दयी आई समोर प्रियकराने केली चिमुल्याची हत्या, कपड्यात बांधून मृतदेह फेकला नदीत.
- नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने मागितली साडेचार हजाराची लाच; संशयित लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…