कवयित्री बहिनाबाई चौधर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधे स्वतंत्र विधी विभाग ( डिपार्टमेंटल आँफ लाँ ) तात्काळ सुरु करा.

Spread the love

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ने प्रभारी प्र.कुलगुरु पवार यांना मागणीचे दिले निवेदन

जळगाव – (प्रतिनिधी) – आम्ही महाराष्ट्र स्टडंट्स युनियन ( मासु ) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या हक्क आणि अधिकारांच्या पूर्ततेसाठी न्यायिक स्वरुपाचा लढा देण्याचे कार्य करीत आहोत.

कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधे स्वतंत्र विधी विभाग ( डिपार्टमेंटल आँफ लाँ ) तात्काळ सुरु करण्यात यावे असे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) ने प्रभारी प्र.कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांना मागणीचे निवेदन दिले.विद्यापीठाची स्थापना होऊन गेली ३२ वर्ष झाले तरी आपल्या विद्यापीठामधे स्वतंत्र विधी विभाग ( डिपार्टमेंटल आँफ लाँ ) नाही ही खुपच मोठी शोकांतिका आहे आणि खेदजनकच आहे. आपल्या विद्यापीठामधे दरवर्षी हजारो विद्यार्थी विधीचे शिक्षण घेऊन पुढच पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई,पुणे सारखे शहराकडे वळतांनी ची संख्या खुपच मोठ्या प्रमाणात आहे.

तसेच आम्ही आपल्या निदर्शनास आणु देऊ इच्छितो की,विधी शिक्षणाची मागणी वर्षगणिक वाढत असुन विद्यार्थ्याच्या विधी अभ्यासक्रमाकडे वाढता कल ही महाराष्ट्रासाठी समाधानकारक बाब आहे.विधी शिक्षण हे सामाजिक न्यायाचे पहिले पाऊल आहे असे आम्ही समजतो व त्यास आपणांस काही शंका नसावी.

यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२१/२२ मधे हजारो विद्यार्थ्याने प्रवेश नोदणी प्रक्रिया सहभाग घेतला असून यावरुन आपण समजूच शकता की, मागणी किती वाढलेली आहे.ह्यासंदर्भात आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विधी शिक्षणामध्ये संधी निर्माण करण्यात याव्यात व त्यासाठी लवकरात लवकर विधी विभाग आपल्या विद्यापीठामधे सुरु करण्यात यावे.

यावेळी मासुचे राज्य सचिव अरुण चव्हाण, उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सहसचिव दिपक सपकाळे,जिल्हाध्यक्ष रोहन महाजन,जिल्हासचिव रोहित काळे, शुभम जाधव तसेच इतर पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

टीम झुंजार