नंदुरबार : आवडत नाही व कुटुंबाला शोभत नाही म्हणून विवाहितेचा छळ करून तिला घरातून काढून दिल्याची घटना वडझाकण, ता. अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी विसरवाडी पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेही, ता. नवापूर येथे राहणारी कौशल्याबाई दिनेश वळवी (३१) या महिलेचा विवाह वडझाकण, ता. नवापूर येथील दिनेश रायसिंग वळवी यांच्याशी झाला होता.
विवाहानंतर अर्थात जानेवारी २०२३ पासून ते आजपर्यंत कौशल्याबाई यांना सासरची मंडळी विविध कारणांनी छळ करीत होती. पती दिनेश याने तु आवडत नाही म्हणून त्रास देणे सुरू केले. घरातील इतर मंडळींनी त्यांना तु कुटुंबाला शोभत नाही म्हणून टोमणे मारणे सुरू केले. त्यातून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. शेवटी त्यांना घरातून हाकलून दिले.
या सर्व प्रकाराला कंटाळून कौशल्याबाई वळवी यांनी फिर्याद दिल्याने दिनेश रायसिंग वळवी (३३), रायसिंग गोमा वळवी (५५), सयूबाई रायसिंग वळवी (५०), मोग्या फत्तू वळवी (३३) सर्व रा. वडझाकण, ता. नवापूर यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस जमादार नरेंद्र वळवी करीत आहे.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






