हत्येपूर्वी गुंड अतिक अहमदचे शेवटचे शब्द काय होते? नेमकी कशी झाली हत्या?
प्रयागराज :- माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोघांनाही मेडिकलसाठी घेऊन जात असताना काही अज्ञातांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या दोघांचीही डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली.घटनास्थळी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तीन जणांनी फायरिंग करत या दोघांना ठार केलं आहे. यानंतर संपूर्ण घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोळीबार झाला तेव्हा अतिक आणि अशरफ दोघेही जागीच कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
काय घडली घटना?
पोलीस अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांची मेडिकल चाचणी करण्यासाठी आणण्यात आलं. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक आणि अशरफ या दोघांना मेडिकलसाठी नेण्यात येत होतं. त्यावेळी तिथे ANI, PTI या वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी अतिकशी बोलत होते. अतीक आणि अशरफ मीडियाशी बोलत असतानाच या दोघांवर पोलिसांच्या घेऱ्यात घुसून गोळीबार केला. या भागात अंधाधुंद गोळीबार झाला त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. गोळ्या लागल्यामुळे अतिक आणि अशरफ या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ANI ने या संदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला आहे.
अतीकचे शेवटचे शब्द काय होते?
तुम्ही काही म्हणू इच्छिता का? तुम्हाला अंत्ययात्रेत नेलं गेलं नाही. “हो आम्हाला नाही नेलं गेलं. पण मुख्य गोष्ट ही आहे की..” बस यापुढे अतीक अहमद काही बोलणार तितक्यात त्याच्यावर आणि अशरफवर गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांवर ज्या गोळ्या झाडल्या त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अतीक अहमदच्या मुलाचं एन्काऊंटर कऱण्यात आलं. त्यापाठोपाठ आता अतीक आणि अशरफ या दोघांची हत्या करण्यात आली.

काय म्हणाले अखिलेश यादव व असुदुद्दीन औवेसी–
या ट्रेंडमध्ये या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. एकीकडे या हत्येचं समर्थन होत असताना दुसरीकेड समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांनी या घटनेवर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशात गुन्हेगारीने सीमा ओलांडली आहे. आरोपींचा जोश वाढत आहे. जर पोलिसांच्या घेरावमध्ये घुसून कोणाची तरी हत्या करण्यात येत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचं काय?, असा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला आहे. तसेच, या घटनांमुळे जनेतेमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून काही लोकं जाणीवपूर्वक असं वातावरण निर्माण करत असल्याचं वाटतं, असेही यादव यांनी म्हटले.
अतिक आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात होते, त्यांच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यावेळी, जय श्रीरामचेही नारे देण्यात आले. या दोघांची हत्या योगी सरकारच्या कायदा व्यवस्थेचा नाकामीपणा आहे, तर एन्काऊंटर जश्न साजरा करणारेही या हत्येस जबाबदार आहेत, असे म्हणत एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
तीन लोकांनी झाडल्या गोळ्या —–
प्रयागराजमधील मेडिकल कॉलेजबाहेर तीन जणांनी जय श्री राम, अशा घोषणा देत अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफवर गोळ्या झाडल्या. यानंतर या तिघांनीही तत्काळ आत्मसमर्पण केले आहे.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






