जरंडी, ता.१६.(साईदास पवार)..देशभर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचा जल्लोष सुरू असताना मात्र शुक्रवारी( दि.१४) माळेगाव(पिंप्री) येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ अभिवादन करण्यासाठी आले असता थेट ग्रामपंचायत कुलूपबंद अवस्थेत आढळून आली ग्रामसेवक प्रफुल्ल गोरे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा विसर पडला होता त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून संबंधित ग्रामसेवका वर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे
माळेगाव(पिंप्री) ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रफुल्ल गोरे यांनी (ता.१४) कोणतीही पूर्व सूचना वरिष्ठांना न देता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनी ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर राहून कार्यालयाची चावी सोबत घेऊन गेल्या चा आरोप शिवराम जाधव यांनी केला आहे परिणामी ग्रामपंचायत कार्यालयात कुलूप असल्याने गावातील समाज बांधवांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता आले नाही त्यामुळे समाज बांधवांमध्ये संताप पसरला होता
याप्रकरणी ग्रामस्थांनी सोयगाव तहसील व पंचायत समितीच्या कार्यालयात लेखी निवेदन देऊन निवेदनात नमूद केले आहे की या ग्रामसेवका ने हेतुपुरस्सर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली नसल्याचा आरोप करून त्यांचेवर तातडीने निलंबित करण्याची कारवाई करावी अन्यथा समाज बांधवांसह आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर शिवराम जाधव, दिलीप सोनवणे, प्रमोद सोनवणे, आकाश वाघ, एकनाथ सोनवणे,अंकूश जाधव, रोशन जाधव, रावसाहेब पाटील, बापू पाटील, लश्क्षूमन जाधव आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत…
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






