How Do Flat Feet Affect Your Overall Health? पायाचे तळवे आग करतात, पाऊलं दुखतात यावर नक्की उपाय काय?
शरीराचं संपूर्ण वजन तळव्यांवर पडते. पण जर तुमचा सोल योग्य नसेल तर, त्यामुळे पाठ आणि गुडघेदुखी होऊ शकते. या समस्येला फ्लॅट फूट असे म्हणतात. या समस्येमध्ये कोणतीही वेदना होत नाही. परंतु, बऱ्याच काळापर्यंत दुर्लक्ष केल्यास गुडघे, कंबर, पाय आणि तळवे सूजण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यामुळे तणाव देखील वाढते.
यासंदर्भात, योग तज्ज्ञ आकाश सिंघल सांगतात, ”चालण्याव्यतिरिक्त आपले तळवे जमिनीचा धक्का शोषण्याचे काम करतात. जेव्हा पायाची कमान कमी किंवा ताठ असते, तेव्हा त्याचा फटका थेट गुडघ्यापर्यंत आणि कंबरेवर पडतो. त्यामुळे कंबर व पाठदुखीसारखी समस्या निर्माण होते. तळाच्या या स्थितीला वैद्यकीयदृष्ट्य़ा पेस प्लानस म्हटले जाते. यामुळे चालण्याची क्षमता मर्यादित होते. म्हणून काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
फ्लॅट फूट योग्य करण्याची पद्धत

एक्यूप्रेशर पाथवर चाला

एक्यूप्रेशर मार्गावर चालणे हा उपाय सपाट पायांसाठी उपयुक्त ठरेल. दररोज किमान १० मिनिटे एक्यूप्रेशर मार्गावर चाला. किंवा गवतावर चालणेही फायदेशीर ठरू शकते.
टॉवर एक्सरसाइज

एक टॉवेल पसरवा. आता त्याच्या एका बाजूला अर्धा सोल ठेवा. नंतर आपल्या बोटांनी टॉवेल वर आणण्याचा प्रयत्न करा. आपण टॉवेलऐवजी कापड देखील वापरू शकता. हा उपाय नियमित १० मिनिटांसाठी करा.
वॉल एक्सरसाइज
हा व्यायाम करताना भिंतीचा आधार घ्या. पंजे भिंतीवर ठेवा आणि टाच जमिनीवर ठेवा. दोन्ही गोष्टी स्थिर ठेवून वासरांना हळूहळू ताण द्या. यामुळे वासराचे स्नायू ताणणे सुरू होईल. हा उपाय निदान १० मिनिटे करण्याचा प्रयत्न करा.
उत्तानासन
भिंतीचा आधार घेऊन उत्तानासन करणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा. दीर्घ श्वास घेताना दोन्ही हात वरच्या दिशेला हलवा, नंतर श्वास सोडताना हात खाली आणा. या दरम्यान, पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा, व त्याच स्थितीत परत या. यामुळे आपले पाय मजबूत आणि लवचिक बनतात. यासह पाठदुखी, कंबरदुखी या समस्येपासूनही आराम मिळेल. हे ४५ सेकंद किंवा शक्य तितक्या काळासाठी करा.
हे वाचलंत का ?
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






