राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदार अजित पवारांसोबत; एका वृत्तपत्राच्या बातमीनं खळबळ,शरद पवारांचे मौन,राजकीय वर्तुळात चर्चा.

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याचपार्श्वभूमीवर एका बातमीने खळबळ उडवली आहे. राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या बातमीनं खळबळ उडाली आहे. योग्यवेळ आल्यावर 40 आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याची बातमी द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिली आहे.

अजित पवारांनी 40 आमदारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधला असल्याचंही या वृत्तपत्रात म्हणण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी अजित पवारांनी शपथ घेतल्यास सरकर पडण्याची वेळ येणार नाही, असं द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हणण्यात आलं आहे.

अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि नाराज असल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवारांकडे आहे हे वृत्त समोर आल्यानंतरही शरद पवारांनी या सगळ्याबाबत सूचक मौन बाळगलं आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार