परभणी : सद्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र नवीन कुलर बसविणे,जुने कुलर रिपेअर करण्याचे काम सर्वत्र सुरू आहे.अशी दुदैवी घटना घडली आहे कु हीलरचे काम करत असताना विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना परभणी शहरातील रामकृष्ण नगर भागात सोमवारी दुपारी दोन ते अडीच च्या सुमारास घडली.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संभाजी अशोक थोरे (२३, रा.रामकृष्ण नगर) आणि रोहित शिवाजी उमरीकर (२२, रा.रामकृष्ण नगर) हे दोघे रामकृष्ण नगर भागातील एका घरामध्ये कुलर बसविण्याचे काम करीत होते. त्यावेळी विजेचा दाब कमी अधिक होत असल्याने व वीजपुरवठा सतत खंडित होत असताना अचानक संभाजी थोरे यास विजेचा जोरदार धक्का लागला. संभाजी थोरे याला वाचविण्यासाठी गेलेला रोहित उमरीकर यालाही विजेचा धक्का बसला.
यानंतर दोन्ही युवकांना वसमत रोडवरील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. यानंतर सदरील दोघांचे मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






