धरणगाव :- तालुक्यात 19 वर्षीय विवाहित सुनेवर सासर्यानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी पीडीतेने भोपाळ येथे तक्रार नोंदवल्यानंतर अधिक तपासार्थ हा गुन्हा धरणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
शेतात व घरात अत्याचाराचा आरोप
19 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, 29 मार्च ते 11 एप्रिल 2023 च्या दरम्यान संशयित आरोपी असलेल्या सासर्याने शेतात व राहत्या घरात वेळोवेळी जबरदस्तीने शारीरीक संबंध निर्माण केले. या प्रकरणी पीडीतेने भोपाल येथे पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर तो तपासार्थ गुन्ह्याची कागदपत्रे जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवण्यात आली व पोलीस अधीक्षकांनी गुन्ह्याच्या तपासार्थ कागदपत्रे धरणगाव पोलिसांकडे पाठवल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






