महेंद्रगड :- हरियाणाच्या महेंद्रगड इथं हनीट्रॅपचा हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एका महिलेने युवकाला गोड बोलून त्याच्या घरी बोलावले. त्यानंतर बळजबरीने त्याच्यासोबत संबंध ठेवले.इतकेच नाही तर त्याचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर युवक जेव्हा घरी जायला निघाला तेव्हा त्याला ब्लॅकमेल करण्यास महिलेने सुरूवात केली.
पीडित युवकाने सांगितले की, मागील काही दिवसांपासून माझ्या नंबरवर अज्ञात कॉल येत होता. हा कॉल एका महिलेचा होता. तिने ५-६ वेळा मला कॉल करून भेटण्यासाठी तिच्या घरी बोलावले. या महिलेवर भरवसा ठेवत मी तिच्या घरी गेलो. घरी पोहचल्यावर महिलेने बळजबरीने माझ्याशी शारिरीक संबंध बनवले. जेव्हा मी घरातून बाहेर जायला लागलो तेव्हा तिने मला व्हिडिओ दाखवून १० लाख रुपये दे अशी मागणी केली. हे पाहून मला धक्का बसला. त्यावेळी मी गळ्यातील सोन्याची चैन आणि ब्रॅसलेट काढून महिलेला दिले.
या प्रकारानंतर युवक पोलीस अधीक्षकांना भेटला आणि त्यांना ही बाब सांगितली. शनिवारी सकाळी जेव्हा महिलेने पुन्हा युवकाला फोन केला आणि पैशांची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी सापळा रचून युवकाला १ लाख रुपये देत नोटांचे नंबर लिहिण्यात आले. युवकाने महिलेला पैसे दिले तसे सापळा रचलेल्या पोलिसांनी तिला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी हनीट्रॅपची तक्रार नोंदवत महिलेला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






