खिर्डी येथे ईद उत्साहात साजरी.ईद निमित्त दिसून आले हिंदु मुस्लिम एकोप्याचे दर्शन.

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी:-परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील खिर्डी येथे मोठ्या उत्साहाने रमजान ईद साजरी करण्यात आली. रमजान महिन्यातील ३० दिवसांच्या उपवसानंतर ईदचा सण सर्वांमध्ये उत्साह घेऊन आला आहे.देशासह जगभरात आज ‘ईद-उल-फित्र’ म्हणजेच ‘रमजान ईद’ साजरी झाली असून ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो. प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसाची वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना मिठी मारत त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. या वेळी येथिल मशीद मध्ये ईद ची नमाज पठण करण्यात आली तसेच ‘या अल्लाह देशात शांति व समृद्धी नंदू दे,तसेच आपल्या देशाला महासत्ता कर’ अश्या अनेक प्रार्थना करण्यात आल्या. ईद च्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या मिठ्या मनातील द्वेष तसेच इतर वाईट गोष्टी काढून टाकतात.असे या कार्यक्रमा वेळी प्रा. संजय मोरे( सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य), हे बोलत होते.


या प्रसंगी डॉ महेंद्र भालेराव,बाळा साहेब शिरतुरे,किसन महाजन,माजी प स सदस्य दिपक पाटील, निंभोरा पोलीस स्टेशन चे स प निरीक्षक गणेश धुमाळ, मस्जिद अध्यक्ष शेख असलम, उपाध्यक्ष शेख शब्बीर, जाकीर पिंजारी, साबीर बेग, अलाताब बेग, मौलाना अब्दुल रहीम, चंद्रकांत कोळी,प्रवीण धूंदले, कांतीलाल गाढे, रफिक बेग, सुलतान मण्यार, अकबर खान, फारुख शेख,शेख इमरान, याकूब बेग, तूकडू बेग,शेख कय्युम, साजिद खान,आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार