निंभोरा प्रतिनिधी:- परमानंद शेलोडे
रावेर :- ऐनपूर येथील वर्षानुवर्षे चालत आलेली बारागाड्या ओढण्याची परंपरा कोरोना काळ वगळता यंदाही कायम ठेऊन ऐनपूर येथील बारीघाट येथे बारागाड्या ओढण्यात आल्या परंतु यात बारगाड्याचा ताबा सुटल्याने एक जणाचा मृत्यू तर चार ते पाच जण जखमी झाले.
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ही जुनी असून वर्षानुवर्षं येथे
बारागाड्या हे ओढण्यात येत असतात,परंतु संपूर्ण देशात कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने कोरोना काळ वगळता ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली होती.अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी या बारागाड्या ओढण्यात येतात,अक्षयतृतीया निमित्त दि.२३ एप्रिल रोजी ऐनपुर येथील बारिघाट येथे या बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु त्या ओढत असताना गाड्यांचा ताबा सुटल्याने प्रेक्षकांमधून दिनकर रामकृष्ण कोळी,सह भगतीन मंगलाबाई प्रकाश भिल,सुभाष भील,ईश्वर भील,नामदेव भील,किशोर हरी पाटील ,मोहन एकनाथ महाजन, तर बगल्यांमधे सुनील राजाराम महाजन तसेच ज्यु ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रूपा भिल्ल, हे जखमी झाले.पोलीस प्रशासन व गावकरी मंडळी यांनी जखमींना तात्काळ तेथून हलवून रुग्णालयात दाखल केले.
यात दिनकर रामकृष्ण कोळी वय ६० वर्ष यांना जास्त मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता त्यांना मयत घोषित केले. तर बाकी जखमीवर उपचार सुरू आहे.
त्यावेळी भगत म्हणून सोपान भील तर बगले म्हणून सुनील महाजन आणि सचिन महाजन हे सहायक होते.निंभोरा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ज्ञानेश्वर चौधरी, नितीन पाटील योगेश चौधरी व होमगार्ड यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






