कुसुंबा बुद्रुक येथे वादळाच्या तडाख्याने विजतारा तुटुन बैल दगावले , शेतकरी गंभीर जखमी

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी:-परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील कुसुंबा बुद्रुक येथे आज दि. २३ रोजी दुपारी अचानक झालेला अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह विजतारांवर झाड पडल्याने व विजतारा तुटुन पडल्याने शेत शिवारातून घरी जात असतांना शेतकरी आनंदा उघडू महाजन ( वय ६५ वर्ष ) रा.कुसुंबा बुद्रुक हे गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्यांचे मालकीची सुमारे दीड लाख रुपये किंमतीची बैलजोडी जागीच ठार झाली आहे .

ऐन शेतीच्या मशागतीच्या दिवसांत या गरीब शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला शासनाने व प्रशासनाने लागलीच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे .

हे वाचलंत का ?

टीम झुंजार