वावडदा प्रतिनिधी :- सुमित पाटील
जामनेर :- तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वडाळी दिगर शाळेत संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक योगेश काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भागवत घोरपडे,पालक अमोल शिनगारे हे होते.यावेळी संत रविदास यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शिक्षकांनी संत रविदास महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.आपल्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक योगेश काळे यांनी सांगितले की,संत रविदास महाराज यांनी विचार व साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला.सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आज निश्चितच अंगीकारण्यासारखा आहे.विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते.
त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले.सामान्याने निर्भय बनले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.गुलाम होणे हे पाप आहे अशी त्यांची शिकवण होती.आपण सगळे एक आहोत,अशी त्यांची भावना होती.विद्यार्थ्यांनी माहिती समजून घेतली.उपशिक्षक संदिप पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर निलेश भामरे यांनी आभार मानले.