प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल :- तालुक्यातील कासोदा येथील गढी वार्ड भागातील मनोज अरुण आहिरे (१९) याने दि. २२ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरात छताला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना घडली. मनोजची आजी मयत झाल्याने त्याची गावी गेलेली होती तर वडील अरुण आहिरे हे गावात कामानिमित्त गेले होते व मोठा भाऊ हा उत्राण येथील निलाॅन्स कंपनीत कामावर गेला होता. वडील अरुण आहिरे हे बाहेरून घरी परत आल्यावर सदर घटना लक्षात आल्यावर त्यांनी त्यास डाॅक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत मनोज आहिरे याच्या मोठा भाऊ अजय अरुण आहिरे यांनी दिलेल्या खबरीवरून कासोदा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सहदेव घुले हे करीत आहेत. मनोजने गळफास घेतल्याचे कारण समजू शकलेले नाही. मनोज आहिरे याचे एरंडोल येथे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






