उन्नाव :- रेल्वेत प्रवास करत असताना प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वेत कधी झुरळ, कधी उंदीर तर कधी पाल दिसल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे तुम्ही ऐकले असेल. याचा अनुभव पण तुम्ही घेतला असेल. उत्तर प्रदेशच्या इटाहचे खासदार राजवीर सिंह यांनी प्रवासादरम्यान मच्छर चावल्याने ट्रेन थांबवली. राजवीर सिंह हे लखनऊवरुन दिल्लीच्या दिशेने निघाले होते. गोमती एक्प्रेसमधून ते प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान त्यांना मच्छर चावला. त्यानंतर त्यांनी जे काही केलं त्यामुळे संपूर्ण रेल्वे प्रशासनच खडबडून जागं झालं.
मच्छर चावल्याने खासदाराने चक्क ट्रेनच थांबवली. खासदाराने तक्रार केल्याने तात्काळ दखल घेण्यात आली.खासदाराने तक्रार केल्यामुळे रेल्वे कर्मचारी घाईघाईत ते प्रवास करत असलेल्या बोगीमध्ये पोहचले. ट्रेन थांबवल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी संपूर्ण बोगीमध्ये स्वच्छता केली. या बोगीची स्वच्छता झाल्यानंतर ट्रेन दिल्लीला रवाना झाली. खासदार राजवीर सिंह यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मान सिंह यांनी ट्वीटरवर ट्रेनमध्ये मच्छर चावल्याची तक्रार केली होती.
या तक्रारीमध्ये त्याने असे लिहिले होते की, ‘ट्रेनच्या फर्स्ट एसी कोचमध्ये खासदार राजवीर सिंह प्रवास करत आहेत. ट्रेनचे बाथरुम खराब आहे आणि मच्छर चावत आहे. यामुळे खासदार राजवीर यांना याठिकाणी बसणं देखील कठीण झाले आहे.’या ट्वीटनंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाग आली. ट्रेन उन्नाव येथे थांबवण्यात आली. यानंतर संपूर्ण बोगी स्वच्छ करण्यात आली. डास दूर करण्यासाठी संपूर्ण बोगीमध्ये औषध फवारणी करण्यात आली. यानंतर उन्नाव रेल्वे स्थानकावरून ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
सामान्य माणसाला ट्रेनने प्रवास करताना अशा प्रकारच्या अनेक समस्यांना नेहमी सामोरे जावे लागते. तरी देखील त्याची दखल घेतली जात नाही. पण एखाद्या नेत्याला अडचण आली तर त्याची प्रशासन तात्काळ दखल घेते. या प्रवासादरम्यान पाणी टंचाई, कधी घाणीचे साम्राज्य तर कधी उन्हाळ्यात ट्रेनमधील पंखे खराब झाल्याच्या अनेक तक्रारी प्रवासी करत असतात. पण त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात नाही. त्यामुळे ते संताप व्यक्त करताना दिसतात.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






