सोने-चांदीच्या व्यापार्‍यावर हल्ला करून ,एवढ्या लाखाचा ऐवज लांबवला.

Spread the love


एरंडोल :- माळपिंप्री तालुका एरंडोल येथील सोन्या-चांदीचे व्यापारी रवंजे येथील दुकान बंद करून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराकडे येत असताना मोटरसायकलवर आलेल्या तीन युवकांनी व्यापाराची मोटरसायकलला धडक देऊन त्याच्या पाठीवर व दंडावर चाकूने वार करून त्याच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने घेऊन पसार झाले.

दरोड्यात वापरलेली मोटरसायकल


रस्त्यावर भर दुपारी व्यापाऱ्यांची लूट करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की माळ पिंप्री तालुका एरंडोल येथील राजेंद्र बबन विसपुते वय पन्नास वर्ष यांचे रवंजे येथे श्री समर्थ कृपा ज्वेलर्स नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे. राजेंद्र विसपुते हे दररोज सकाळी नऊ वाजता माळपिंप्री येथून रवंजे येथे जात असतात आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राजेंद्र विसपुते ही नेहमी प्रमाणे पिंपळकोठा येथील लाठी पेट्रोल पंप जवळ असलेल्या कच्च्या रस्त्याने चोरटक्की मार्गे रवंजे येथे गेले दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले आणि आपली मोटरसायकल क्रमांक एम एच 19 सी बी 9781 मी घराकडे यायला निघाले विखरण ते चोरटक्की दरम्यान असलेल्या टेकडीवर त्यांच्या पाठीमागून पाठलाग करत असलेल्या मोटरसायकल वरील तीन अज्ञात व्यक्तींनी ओव्हरटेक करून मोटर सायकल आडवी लावून त्यांना अडवले त्यानंतर तीन पैकी एकाने त्यांच्यावर पिस्तोल रोखले व दुसर्याने त्याच्या दंडावर आणि पाठीवर चाकूने वार करून जखमी केले तिसऱ्या व्यक्तीने त्यांच्या जवळ असलेली नायलॉनची फिश पिशवी हिसकावली. पिशवी मध्ये असलेले सुमारे दीडशे ग्रॅम सोने, चार किलो चांदी व 52 हजार रुपये रोख व रेडमी कंपनीच्या मोबाईल असा सुमारे 8 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज घेऊन व्यापारी राजेंद्र विसपुते यांची मोटर सायकल घेऊन पसार झाले.

तिन्ही लुटारूंनी काळ्या रंगाच्या फडक्याने आपले चेहरे बांधले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांची होंडा शाईन कंपनीची मोटर सायकल घटनास्थळी सोडून दिली. जखमी झालेले व्यापारी राजेंद्र विसपुते यांनी जोरजोरात आरोळ्या मारून मदत मागितली त्यावेळी विखरन रस्त्यावरून तीन ते चार नागरिक पळत येत असल्याचे पाहून चोरट्यांनी व्यापाऱ्याची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटर सायकलवरून रिंगणगावकळे पलायन केले.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन हे कामासाठी एरंडोल येथे येत असताना त्यांना राजेन्द्र विसपुते जखमी अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी वाहन थांबवून त्याची चौकशी केली.जि प सदस्य नाना महाजन यांनी स्वतःच्या वाहनातून पाळधी येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. पत्रकार संजय चौधरी यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला कळवले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी पोलिसांना घटनास्थळी रवाना करून आरोपींचा तपास करण्याबाबत सूचना केल्या. कर्मचारी महेंद्र पाटील,राजेश पाटील, मिलिंद कुमावत, अनिल पाटील, पंकज पाटील, अकिल मुजावर, प्रशांत पाटील, सुनील लोहार विकास खैरनार, काशिनाथ पाटील, यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसर पिंजून काढला मात्र आरोपीच्या तपास लागू शकला नाही.
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा पिंपरी बुद्रुक चे सरपंच तथा एस आर पाटील यांनी जखमी राजेंद्र विसपुते यांची भेट घेत भेट घेतली व चौकशी करून धीर दिला.
अमळनेर विभागाचे राकेश जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

टीम झुंजार