Viral Video: चोरीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, याचं कारणही तसंच आहे. कारण चोरी करायला आलेले चोर चोरी करण्याऐवजी धूम ठोकून पळाले. गाडी चोरताना असं काही घडलं की त्यांनी स्वतःचीच गाडी सोडून पळ काढला आहे.
चोरी करताना चोरांसोबत असं काहीतरी घडलं की चोरी करणं सोडून त्यांनी भीतीने तिथून पळ काढला. दोन चोर जे स्कूटीवरून स्कूटी चोरायला आले होते पण त्यांना त्यांचीच स्कूटी तिथं सोडावी लागली. चोरीची ही अजब घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर हा व्हिीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका गेटमधून दोन व्यक्ती बाहेर पडताना दिसत आहेत. या व्यक्ती म्हणजे चोर आहेत. घराबाहेर पार्क केलेली स्कूटी ते चोरताना दिसत आहे. दोघंही स्कूटीवर बसून आले होते.
त्यानंतर एक चोर आपल्या स्कूटीवर आणि दुसरा चोरीच्या स्कूटीवर बसला. ते स्कूटी पळवत होते, इतक्यात कुणीतरी त्यांना पाहिलं आणि आरडाओरडा केला. त्यानंतर सर्व बाजूंनी माणसं धावत आली आणि चोरट्यांची चांगलीच धुलाई केली. त्याचवेळी चोरांचीही स्कूटी खाली पडली.
ती स्कूटी उचलण्याचा प्रयत्न ते करत होते. पण लोकांनी त्यांना त्यांची गाडीही घ्यायला दिली नाही. शेवटी जीव महत्त्वाचा म्हणून चोरांनी आपली गाडीही तिथंच सोडली आणि तिथून आधी पळ काढला. रस्त्यावर पडलं होतं पैशांनी भरलेलं पाकिट, व्यक्तीने उचलताच…; काय घडलं पाहा @Ambrish89 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.ही घटना नेमकी कुठली आणि कधीची आहे माहिती नाही. व्हिडीओत दिलेल्या तारखेनुसार ही घटना 2 एप्रिल, 2023 ची आहे. पण नेमकी कुठली आहे. याबाबत माहिती नाही.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






