वाशिम :- मध्ये चमत्कारिक व्हिडीओ समोर आला आहे. देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती हा व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल. एक चार वर्षांची चिमुकली खेळत असताना इमारतीवरुन कोसळली.मात्र तरीही ती यातून सुदैवाना बचावली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घटना वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरातील महानंदा कॉलनीत काल घडली आहे. एक चार वर्षाची चिमुकली घराच्या गॅलरीत खेळत असताना तिचा तोल जाऊन जवळपास 30 फुटाच्या उंचीवरून खाली पडली.
मात्र खाली उभ्या असलेल्या बाईकच्या सीटवर ती पडली. त्यामुळे तिला कोणतीही इजा झाली नाही. एवढ्या उंचीवरुन पडल्यानंतरही लहानगी लगेच उभी राहते. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






