जळगाव जिल्ह्यातील 12 पोलीस कर्मचार्‍यांना महासंचालक पदक प्रदान

Spread the love

जळगाव :- जिल्ह्यातील पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेली उत्तम कामगिरी आणि उल्लेखनिय सेवेबद्दल 12 पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी काढले आहेत.

पोलीस दलात सेवा बजावित असतांना उत्तम काम करणार्‍या राज्यभरातील कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांचे प्रस्ताव पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून मागविण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील अनेक कर्मचार्‍यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असतांना वविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेली उत्तम कामगिरी आणि उल्लेखनिय सेवेबद्दल ११ पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

यांना मिळाले पदक…… पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार पुढील प्रमाणे ०१) पोलीस उप निरीक्षक, विनयकुमार भीमराव देसले, ०२) सहा.पोलीस उप निरीक्षक, संजय हरिदास पवार, ०३) सहा. पोलीस उप निरीक्षक, नरेंद्र हिरालाल कुमावत, ०४) पो. हवा. सचिन सुभाष विसपुते, ०५) पो. हवा. सुनील अर्जुन माळी, ०६) पो. हवा. मनोज काशिनाथ जोशी, ०७) पो. हवा. राजेश प्रभाकर चौधरी, ०८) पो. हवा. सुनील माधव शिरसाठ, ०९) पो. हवा. रवींद्र धोंडू घुगे, १०) पो. ना. विजय अशोक दुसाने, ११) पो. ना. अल्ताफ सत्तार मन्सुरी, १२) पो. ना. अमोल भारत विसपुते. यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार