22 हजार रुपये घेऊन आरोपीला सोडलं, पीडित मुलीच्या वडिलांनी केला पोलिसांवर आरोप.
इंदूर : कानडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आलीये.इथं राहणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नात मेहंदी लावण्याच्या बहाण्यानं दोन नराधमांनी पळवून नेलं.
तावडीतून सुटण्यासाठी मुलीनं त्यांना वडिलांना फोन करण्यास सांगितलं. मात्र, आरोपींनी ते मान्य न करता अल्पवयीन मुलीला घेऊन निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
या घटनेनंतर आरोपीला परिसरात पाहून संतप्त नागरिकांनी बेदम मारहाण करत त्यांची गावातून धिंड काढली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली आहे. वस्तीत राहणाऱ्या एका 12 वर्षांच्या मुलीला दोन आरोपींनी पळवून लावलं होतं. पालकांनी मुलीचा परिसरात शोध घेतला. परंतु, मुलगी न सापडल्यामुळं रविवारी सायंकाळी उशिरा कानडिया पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपींनी मुलीला दूर कुठंतरी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला, असं तक्रारीत नमूद केलंय.
22 हजार रुपये घेऊन एएसआयनं तरुणांना सोडलं, असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांवर केलाय. यानंतर परिसरात आरोपी दिसताच संतप्त नागरिकांनी आरोपींवर तुटून पडून त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना विवस्त्र करून, गळ्यात चपलांचा हार घालून त्यांची गावातून धिंड काढली. आरोपी हृतिक आणि रोहित हे दोघंही परिसरातील रहिवासी आहेत. याप्रकरणात आरोपींकडून पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप आहे.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






