योगेश महाजन यांचा संगमनेर येथे सत्कार…

Spread the love

एरंडोल प्रतिनिधी:- प्रकाश शिरोडे

एरंडोल :- येथील माजी उपनगराध्यक्ष तथा युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव योगेश महाजन यांनी युवक कॉंग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे,नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष योगेश महाजन यांनी केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच योगेश महाजन व त्यांच्या सहका-यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षांना तारेचे कुंपण लावण्यात आले.संगमनेर नगरपालिकेने वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,आमदार सुधीर तांबे,युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आगामी काळात होणा-या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन करून पक्षसंघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.तसेच वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव पर्याय असल्यामुळे सर्व पदाधिका-यांनी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन हा उपक्रम हाती घेण्याच्या सुचना केल्या.

  

टीम झुंजार