सुनेचे दोन तरुणांसोबत अनैतिक संबंध, सासूला सुनेचा प्रताप कळताच तिने केलं असं काही की महिला पुरती अडकली. या प्रकरणी पोलिसही अधिक तपास करत आहेत.
महराजगंज (उत्तर प्रदेश) :- नवरा कामाच्या शोधात परदेशात गेला, बायको गावाला सासू सासऱ्यांसोबत राहत होती. नवरा बाहेरगावी असल्याने पत्नीचं सतत माहेरी येणं-जाणं सुरू होतं. त्याचदरम्यान तिचे माहेरच्या गावातील दोन जणांसोबत सूत जुळलं. सासूला सूनेच्या या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली. तेव्हा सासूने घेतलेल्या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील एका महराजगंज येथे एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. तरुणाचे बाजूच्याच गावातील तरुणीसोबत लग्न झाले. लग्नानंतर काहीच दिवसांत युवक नोकरीच्या निमित्ताने सौदी अरबला गेला. पती परदेशात गेल्यानंतर पत्नी एकटी पडली होती. त्यामुळं ती सतत तिच्या माहेरी जायची. त्याचवेळी तिच्या माहेरच्या गावात राहणाऱ्या दोन लोकांसोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. महिला त्यांना भेटण्यासाठी सतत माहेरी जाऊ लागली.
एकदिवस महिलेने तिच्या दोन्ही प्रियकरांना भेटण्यासाठी सासरच्या घरी बोलवले. ती त्यांच्यासोबत एका खोलीत होती. त्याचवेळी तिची सासूदेखील तिथे आली. खोलीतून तिघांच्या बोलण्याचा आवाज आल्यावर सासूने आत डोकावून पाहिले असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सून दोघां तरुणांसोबत नको त्या अवस्थेत होती. हे पाहताच सासूने खोली बाहेरुन बंद करुन घेतली.
सूनेला आणि दोघा तरुणांना खोलीत बंद करुन पोलिसांना फोन केला. पोलिस येताच सासूने त्यांना घडलेली सगळी हकिकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडून सूनेला आणि दोघा तरुणांना ताब्यात घेतलं. घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितलं की, महिलेने तिच्या सूनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुनेचे दोघा तरुणांसोबत अनैतिक संबंध होते, असं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






