मुंबई : आपल्या देशात आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्ती दादा (Brother) किंवा ताई (Sister) म्हणतात. विशेष म्हणजे मोठ्या भावाला दादा किंवा भैय्या हा शब्द अधिक प्रचलित आहे.ताई किंवा दीदी हा शब्द मोठ्या बहिणीसाठी अधिक वापरला जातो. आता तुमच्या मनात एक शंका आली असेल की आम्ही आज हे तुम्हाला का सांगतोय. त्या संबंधिक एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर (social media) अधिक व्हायरल झाली आहे आणि त्यावर लोकं कमेंट करीत आहेत.
ऑनलाईन व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये एक तरुणीने अशा व्यक्तीसोबत लग्न केलं आहे की, ती त्या व्यक्तीला भाऊ म्हणत होती. त्या तरुणीचं नाव विनी (vini) आहे. विनी आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या पती जय याला भैया म्हणत होती. तरुणीने हे सुध्दा सांगितले की, आम्ही जवळचे नातेवाईक आहोत.
व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये विनी आणि जय यांनी ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट त्यांनी इंस्टाग्रामच्या पेजवरती व्हायरल केली आहे. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्या दोघांचे लहानपणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. विनी ही सुध्दा गोष्ट सांगितली आहे की, तीने जय सोबत लग्न केलं आहे आणि त्यांना एक मुलगा सुध्दा आहे. त्यांच्या लहान मुलाचे काही फोटो सुध्दा व्हायरल रील्समध्ये दिसत आहेत.पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही नातेवाईक आहोत आणि आमच्या वयातील अंतरामुळे मी त्यांना वर्षानुवर्षे भैया म्हणत होते. आता भैया ते सैया.’
हा व्हिडीओ आतापर्यंत 5 मिलियन लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. हे सगळं पाहून स्पष्ट होते की, इंटरनेट या महिलेच्या कथेवर नेटकरी फारसे खूश नाहीत.
एक नेटकरी म्हणतो. ‘हा मजाक नाही आहे, मला खरचं अजीब वाटतं आहे’ दुसर्या यूजरने कमेंट केली की, ‘भाऊ म्हणणे म्हणजे नाते नाही! जो तुमच्यापेक्षा मोठा असेल त्याला भाऊ म्हणता येईल! पण जगाला सांगायची गरज नव्हती, फारसे आवडले नाही.’
हे देखील वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४