एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल शहरात किराणा दुकानांमध्ये वाईन (दारू)उपलब्ध करून देण्याचा विचित्र निर्णय महाराष्ट्र सरकारने त्वरित मागे घ्यावा असे निवेदनमा.तहसीलदार निवासी नायब तहसीलदार एस. पी. शिरसाठ रावसाहेब यांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान एरंडोल तालुक्याच्या वतीने दि. १६/०२/२०२२ बुधवार रोजी देण्यात आले .
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाचा एकमुखी झालेला, वाईन म्हणजे दारुसंबंधीचा निर्णय अत्यंत दुर्देवी, समाजघातक, राष्ट्रघातक, नितिमत्तेचा, शीलाचा संहार करणारा, मुडदा पाडणारा आहे. उगवत्या पिढीला नितीमत्ता, शील, संस्कृती यापासून भरकटत विनाशाच्या दिशेकडे नेणारा राष्ट्रघातक निर्णय आहे.
किराणा मालाच्या तसेच मॉलमध्ये वाईन विक्री करुन शासन काय साधणार आहे हे कळत नाही.. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनजीवनावर याचे विपरीत परिणाम अतिशय गंभीर होणार असे स्पष्ट दिसत आहे. या निमित्ताने राज्यातील किराणा दुकाने व विविध वस्तू भांडारामध्ये राजरोसपणे वाईन (दारु) ची विक्री करुन शेतकऱ्यांना फायदा आणि राज्याचा महसूल वाढवणे अशी गोंडस कारणे पुढे करून महाराष्ट्राचे मद्यराष्ट्रामध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरु केली आहे असेच म्हणावे लागेल.
राज्यात एका बाजूला घरातील कर्त्या पुरुषाच्या दारु पिण्याला वैतागलेल्या माताभगिनी जागोजागी एकत्र येऊन बाटली आडवी करण्याचे आंदोलन करत असताना, त्याच घरातील लहान मुलास सहजपणे प्राप्त होणारी वाईन त्या कुटुंबाची काय दशा करेल याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
एकीकडे मुलांना चांगले संस्कार लाभावेत यासाठी शाळेची सक्ती केली जात असताना दुसरीकडे त्याच मुलाला वाईन म्हणजेच दारु अगदी सहज मिळेल अशी व्यवस्था करण्यामागे निश्चितच काही कुटील डाव स्पष्ट दिसत आहे. शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखाली राजकीय बडी धेंडे आपापल्या वाईन प्रकल्पाद्वारे स्वतःची पोळी भाजून घेत संपूर्ण महाराष्ट्राचेच मद्याचे दुकान करु पहातायत. यास वेळीच आवर घालणे जे चे आहे. नाहीतर या बाइन प्राशनामुळ गुन्हगारी, अशिक्षितपणा, निश्क्रियपणा, व्यसनाधिनता या गोष्टींना वाढ लागेल. राजरोस दारु पिणारी परकीय संस्कृती या महाराष्ट्राला कधीच नको आहे.
हा महाराष्ट्र श्रीशिवछत्रपतींचा श्रीसंभाजीमहाराजांचा महाराष्ट्र आहे. यास या निर्णयाद्वारे काळीमा फासण्याचे काम केले आहे. याचे प्रायश्चित्त म्हणून राज्यकर्त्यांनी श्रीशिवछत्रपतींच्या पायाशी माफी मागावी अशी आमची सार्वत्रिक मागणी आहे.
शासनाने या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करावा यासाठी आम्ही नागरीक बंधू भगिनी सामुहिकरित्या या निर्णयाच्या विरोधाचे सदर निवेदन आपणास देत आहोत. आपण आपल्या आखत्यारित हे मतशासनदरबारी कळवावे ही नम्र विनंती आहे. तसेच शासनाने घेतलेला हा राष्ट्रघातक निर्णय तात्काळ स्थगित करावा तो झाला नाही तर हे आंदोलन टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र करण्यात येईल व सर्व परिणामास शासन जबाबदार असेल.
समस्त शिवभक्त व धारकरी बांधव उपस्थित होते.