पोलिसांनी केवळ चोवीस तासात लावला तपास.
एरंडोल-माळपिंप्री (ता.एरंडोल) येथील सोनेचांदीचे व्यापारी राजेंद्र विसपुते यांच्यावर हल्ला करून सुमारे साडेदहा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेणा-या लुटारूंना पोलिसांनी केवळ चोवीस तासात अटक केली तर पाचवा आरोपी फरार आहे.
सोने व्यापा-यावर हल्ला
प्रकरणात चार आरोपी गजाआड पाचवा आरोपी फरार
एरंडोल-माळपिंप्री (ता.एरंडोल) येथील सोनेचांदी चे व्यापारी राजेंद्र विसपुते यांच्यावर हल्ला करून सुमारे साडेदहा लाख रुपयांचा ऐवज लुटून नेणा-या लुटारूंना पोलिसांनी केवळ चोवीस तासात अटक केली तर पाचवा आरोपी फरार आहे.
याबाबत माहिती अशी,की माळपिंप्री येथील राजेंद्र विसपुते हे रवंजा येथे सोने चांदीचे दुकान आहे.काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास राजेंद्र विसपुते हे दुकान बंद करून घराकडे जात असतांना विखरण चोरटक्की मार्गावर टेकडीजवळ त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या पाच जणांनी त्यांच्या मोटर सायकलला धडक देऊन खाली पाडले आणि त्यांच्यावर चाकूचे वार करून जखमी केले आणि त्यांच्या जवळ असलेले सोने,चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेवून विसपुते यांच्याच मोटारसायकलने पसार झाले होते.एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी घटना घडताच सर्व पोलीस कर्मचा-यांना परिसरात आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना केल्या होत्या.
अमळनेर विभागाचे पोलीस अधिक्षक राकेश जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सुचना केल्या होत्या.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सर्व बाजूनी तपास करून दिगंबर उर्फ डीग्या रवींद्र सोनवणे रा.भोकर ता.जि.जळगाव,विशाल आतून सपकाळे रा.विठ्ठलवाडी जळगाव,विशाल लालचंद हरदे रा.चौगुले प्लॉट जळगाव,संदीप राजू कोळी रा.चौगुले प्लॉट,जळगाव या चार जनाना अटक केली तर आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे हा फरार झाला आहे.यातील संदीप राजू कोळी आणि आकाश सुरेश सपकाळे या दोन्ही जणांनी राजेंद्र विसपुते यांच्यावर पाळत ठेवली होती.पोलिसांनी संदीप कोळी याचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल जप्त केली. व्यापारी राजेंद्र विसपुते यांची मोटारसायकल दिगंबर सोनवणे याचे जवळून असोदा रेल्वे गेट जवळून ताब्यात घेतली आहे.दिगंबर सोनवणे हा स-हाईत गुन्हेगार आहे.व्यापारी राजेंद्र विसपुते यांच्याजवळून लुटून नेलेला ऐवज व गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल पाचवा फरार आरोपी आकाश उर्फ धडकन सपकाळे याच्या जवळ असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लुट प्रकरणातील सर्व आरोपी वीस ते तीस वयोगटातील असून सर्व स-हाईत गुन्हेगार असल्यामुळे त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.अमळनेर विभागाचे उपअधीक्षक राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व त्यांचे सहकारी हवालदार महेंद्र पाटील,राजेश पाटील,अनिल पाटील,पंकज पाटील,अकिल मुजावर,मिलिंद कुमावत,विकास खैरनार,प्रशांत पाटील,सुनील लोहार,काशिनाथ पाटील यांनी चोवीस तासाच्या आत आरोपीना अटक केली.
लुट प्रकरणातील आरोपीना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे होते.पोलीस कर्मचा-यांनी अत्यंत जलदगतीने आणि गुप्त पद्धतीने तपास करून आरोपींना ताब्यात घेतल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.पुढील तपास निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत..