एरंडोल-तालुक्यातील तीन शेतकरी आत्महत्या व पुरात वाहून गेलेल्या एका व्यक्तीच्या वारसांना आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
तालुक्यातील नांदगाव येथील दिलीप कथ्थू पाटील,गोरख ईश्वर महाजन व ताडे येथील ज्ञानेश्वर संजय धनगर या शेतक-यांनी सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.
तसेच रिंगणगाव येथील नवल त्र्यंबक सपकाळे हे नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्यामुळे मयत झाले होते.शासनातर्फे सुनंदा दिलीप पाटील,योगिता ईश्वर महाजन,सुनीताबाई संजय धनगर या आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये तर सुरेखा नवल सपकाळे यांना चार लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश आमदार चिमणराव पाटील पाटील यांच्याहस्ते महाराष्ट्रदिनी वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी शेतक-यांनी कर्ज व नापिकी यासारख्या संकटाना कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलू नये असे आवाहन केले.राज्य शासन शेतक-यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,तहसीलदार सुचिता चव्हाण,नायब तहसीलदार प्रविण भिरूड,महसूल नायब तहसीलदार दिलीप पाटील,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह महसूल कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.