छपरा (बिहार) येथे एक अजब प्रकार घडला आहे. वरात घेऊन आलेल्या नवरदेवानं नवरीच्या गळ्यात माळ घातल्यानंतर मांडवात हायव्होल्टेज ड्रामा झाला. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.
बिहारच्या छपरामध्ये एका लग्न सोहळ्यात भलताच किस्सा घडला आहे. नवरदेव नवरीच्या घरात वरात घेऊन पोहोचला. मुलीकडच्यांनी वऱ्हाडी मंडळींचं स्वागत केलं. दोन्हीकडची मंडळी आनंदात होती. शेकडोंच्या उपस्थितीत जयमालाचे विधी झाले. सगळं व्यवस्थित, विधीवत सुरू होतं. नवरदेवानं नवरीच्या गळात माळ घातली. त्यानंतर मांडवात ड्रामा सुरू झाला.
नवरदेवानं वधूच्या गळ्यात माळ घातल्यानंतर तिच्या लहान बहिणीनं वेगळाच ड्रामा सुरू केला. तरुणी छतावर चढली. आपल्या होणाऱ्या भाऊजींना कॉल करून छतावरुन उडी मारण्याची धमकी देऊ लागली. दिदीशी लग्न केलंत तर मी छतावरुन उडी मारुन जीव दईन, अशी धमकी तिनं दिली. यानंतर मांडवात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. दोन्ही परिवार भिडले. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला.
लहान बहिण लग्नासाठी अडून बसली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीनं नवरदेवाचं लहान बहिणीशी लग्न झालं. मांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भभौली गावातील या घटनेची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, छपरा शहरात राहणाऱ्या जगमोहन महतो यांचा मुलगा राजेशचा विवाह वर्षभरापूर्वी रिंकू कुमारीशी ठरला. मात्र वर्षभरात राजेशचा संवाद रिंकूशी कमी, तिच्या लहान बहिणीशीच जास्त व्हायचा. आपल्या होणाऱ्या मेहुणीला घेऊन तो परीक्षा केंद्रावरही गेला होता.
होणाऱ्या मेहुणीशी राजेशची जवळीक वाढली. मात्र दोन्ही कुटुंबांना याची कल्पना नव्हती. मंगळवारी रात्री राजेश नवरदेव होऊन वरात घेऊेन पोहोचला. तेव्हा रिंकूच्या लहान बहिणीनं ड्रामा सुरू केला. दोन्ही परिवारांमध्ये रात्रभर वाद झाला. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत घातली. रिंकू कुमारीच्या परवानगीनं तिच्या लहान बहिणीचा विवाह करून देण्यात आला. त्यानंतर वऱ्हाड रवाना झालं
हे देखील वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






