सोने-चांदी दागिने लूट प्रकरणातील संशयितांना इतक्या दिवसांची पोलीस कोठडी.

Spread the love


एरंडोल:-माळपिंप्री तालुका एरंडोल येथील सोन्या-चांदीचे व्यापारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि सोने-चांदी दागिन्याचा सुमारे 9 लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या चार संशयितांना आज न्यायालया समोर उभे केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी दिला.


याबाबत माहिती अशी की माळपिंप्री तालुका एरंडोल येथील सोन्या-चांदीचे व्यापारी राजेंद्र विसपुते हे रवंजे येथील दुकान बंद करून घराकडे येत होते. विखरण ते चोरटक्की रस्त्यावर असलेल्या टेकडी जवळ त्यांच्या मोटरसायकलला धडक देऊन व्यापारी राजेंद्र विसपुते यांच्यावर चाकूने वार करून जखमी करून त्यांचे जवळ असलेला ऐवज हिसकावून पसार झाले होते.

जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि एरंडोल पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दिगंबर उर्फ डीग्या रविंद्र सोनवणे, विशाल अरुण सपकाळे, विशाल लालचंद हरदे, संदीप राजू कोळी यांना ताब्यात घेतले तर त्यांच्या सहकारी आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे हा सर्व आयोयो गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल घेऊन फरार झाला आहे. पोलिसांनी चारही संशयितांना आज न्यायालयात उभे केले असता सर्वांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी दिला.

अटक केलेले चारही संशयित गुन्हेगार वृत्तीचे असून त्यांच्या त्यांच्या कडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शना खाली अनिल पाटील, मिलिंद कुमावत,पंकज पाटील अकील मुजावर पुढील तपास करीत आहेत.

टीम झुंजार