विशाल महाजन पारोळा । प्रतिनिधी
आज पारोळा शहरातील राम मंदिर चौकातील महिला सौच्छालयाचा प्रश्न मागील 3 वर्षा पासून निवेदन देऊन ही अद्याप दखल घेतली गेली नाही म्हणून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी यांनी पुन्हा एकदा आज पारोळा नगरपरिषद च्या प्रशासकीय चीप ऑफिसर ज्योती भगत मॅडम व पारोळा तहसील ऑफीस ला तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देऊन तसेच पोलीस निरीक्षक संतोष भंडारी यांना ही एक प्रत देत आक्रोश व्यक्त केला राममंदिर चौकातील सौच्छालयाचा दुरावस्था एवढी दैननीय झाली आहे आहे की अक्षरशः रोज लाजिरवाणी परिस्थिती सामोरे जावे लागते.

तरीही सौच्छालयाचा दुरूस्ती करून मिळावी म्हणून एक निवेदन मा. पालकमंत्री तथा प्रदेशउपाध्यक्ष आण्णा साहेब सतिश पाटील यांच्या कार्यालयात ही जमा केली आहे तसेच महिला जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई चौधरी यांच्या सह महाराष्ट्र प्रदेश व महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना ही देण्यात आले आहे. आज सर्वात मोठा गंभीर प्रश्न असा आहे की रस्त्यावरून वापर करता वेळी रोडरोमिओ महिला मलींची छेळ काढतात तर भविष्यात आणखी काही अघटित घडलं तर कोण जबाबदार हाही प्रश्न विचारला गेला आहे

निवेदन जिल्हा उपाध्यक्ष सौ सुनंदा शेंडे मॅडम ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी तर्फे तालुका अध्यक्ष सुवर्णा पाटील व शहर अध्यक्ष अन्नपुर्ना पाटील मॅडम तालुका संघटक सौ.अॅड स्वाती शिंदे मॅडम व तालुका उपाध्यक्ष सौ. जयश्री साळी सहभागी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व राममंदिर चौकातील रहिवासी महिला उपस्थित होते