ना अँपॉइंटमेंट ना कुणाची मध्यस्थी; आपले पालकमंत्री यांच्याशी भेट करा थेट

Spread the love

महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील हे त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी जनता दरबार या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधतात.

रोज सुमारे 250 ते 300 नागरिक याचा फायदा घेत आहेत.

अनेकजण पालकमंत्र्यांशी थेट संवाद साधण्यासाठी मिळणाऱ्या या संधीचा फायदा घेत आपलं म्हणणं रोकठोकपणे मांडतात.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर धुळे, नंदुरबार, बुलढाणा, औरंगाबाद या आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकसुद्धा येऊन विना अँपॉइंटमेंट भेट घेत आहेत.

येणारा माणूस कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही गावाचा असो या मध्ये भेदभाव न करता त्या व्यक्तीचे समाधान करण्याचा प्रयत्न मंत्रीमहोदय करतात. महिला आल्यास त्यांना प्राधान्य मिळते.

सर्वसामान्य जनतेच्या तालुका व जिल्हास्तरावरील असणाऱ्या प्रलंबित समस्या व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणी सोडवण्यासाठी ही जनता दरबाराची संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये जनतेच्या अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून करण्याचा प्रयत्न असतो.

जनतेचे प्रश्न जागेवरच मार्गी लागत असल्यामुळे समाधानाचे वातावरण होते व या जनता दरबारास नागरिक उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहे.

टीम झुंजार