दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय अमितदादा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एन.ए. पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर. एस. पाटील तसेच इतिहास विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. बालाजी पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जन्मापासून ते हिंदवी स्वराज्याच्या अखिल भारतातील स्थापने पर्यंत विविध संदर्भ दाखले देत मार्गदर्शन केले.
रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.नरेंद्र तायडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.शर्मिला गाडगे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय गाढे व उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.