तू काय माधुरी दीक्षित आहेस काय, एक दिवस तुला उचलून घेऊन जाईन, असं म्हणत दोघा आरोपींनी विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे
जळगाव : घराच्या ओट्यावर कपडे धुत असलेल्या विवाहितेने अंगावर पाणी उडेल म्हणून दोघांना बाजूला व्हा असे सांगितले. त्यावर दोघांनी विवाहितेला उद्देशून “तू काय माधुरी दीक्षित आहेस का? तुला एक दिवस उचलून घेऊन जाईन” अशी धमकी देत विवाहितेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना जळगावातील रावेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी रविवारी दोन जणांविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.
रावेर तालुक्यातील एका गावात ३१ वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. १० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विवाहिता ही घरी एकटी होती. यादरम्यान विवाहिता ही घराच्या ओट्यावर कपडे धुत होती. याच ठिकाणी युनूस सायबू तडवी व इरफान नामदार तडवी हे दोघेही आले. दोघेही आपसात बोलत उभे होते.
यावर विवाहिता ही दोघांना तुम्ही याठिकाणी काय उभे राहिले, याठिकाणी उभे राहिले तर तुमच्या अंगावर पाणी उडणार व तुम्ही उलट मलाच बोलणार असे म्हणाली. त्यावर युनूस हा विवाहितेकडे पाहून आता तर फक्त पाहत आहे, तू काय माधुरी दिक्षीत आहे काय, एक दिवस तुला उचलून घेवून जाईन, असे म्हणाला, तर युनूस सोबत असलेल्या इरफान यानेही विवाहितेला उद्देशून त्याच्याशी होकार मिळवत एक दिवस तुला उचलून घेऊन जाऊ, असे तो म्हणाला.
चार दिवसानंतर विवाहितेने दिली पोलीस ठाण्यात तक्रार…..
याचदरम्यान दोघांनी विवाहितेसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलं. तसेच विवाहितेला शिवीगाळ करत जर कोणाला काही सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दोघांनी विवाहितेला दिली.या घटनेप्रकरणी चार दिवसानंतर विवाहितेने रविवारी रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन युनूस तडवी व इरफान तडवी या दोघांविरोधात विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची गंभीर दखत घेत, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दिपाली पाटील यांनी पीडित विवाहितेची घटनास्थळी जाऊन भेट घेतली होती.चौकशीअंती गुन्हा दाखल झाल्यानंतर विनयभंग करणाऱ्या युनूस तडवी, इरफान तडवी या दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश सानप हे करीत आहेत.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४