रस्तालूट प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून सोने-चांदी केले जप्त…

Spread the love

एरंडोल प्रतिनिधी

एरंडोल:- माळपिंप्री येथील सोन्या-चांदीचे व्यापारी राजेंद्र विसपुते यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचे जवळील 52 हजार रुपये रोख,150 ग्राम सोने व चार किलो चांदी असा एकूण 8 लाख 87 हजार रुपयाच्या ऐवज लुटणाऱ्या चार संशयित आरोपींकडून पोलिस कस्टडी दरम्यान सुमारे 2 किलो चांदी व 20 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे.
या रस्ता लूट प्रकरणातील एक संशयित आरोपी आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे अद्याप फरार असून जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण व एरंडोल पोलीस कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची पोलिस कस्टडी संपणार आहे. उर्वरित राहिलेले सोने व चांदी तसेच घटनेच्या वेळी वापर करण्यात आलेल्या पिस्तूल व चाकू याची रीकव्हरी करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे आरोपींना न्यायालयात हजर करून परत पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. तसेच एक फरार संशयित आरोपीसह अजून काही नविन संशयित आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. असे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव सांगितले.

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींकडून दोन किलो चांदी व 20 ग्राम सोने जप्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली अनिल पाटील पंकज पाटील उमेश कुमावत अकील मुजावर राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहे.

टीम झुंजार