एरंडोल येथे निशुल्क सात दिवसीय योग साधना शिबिरचे उद्घाटन

Spread the love

एरंडोल प्रतिनिधी

एरंडोल:- येथील बचपन इंग्लिश स्कुल व ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज सकाळी निशुल्क सात दिवसीय योग साधना शिबिराचे उद्घाटन,प्रतिमापूजन व माल्यार्पण शाळेचे प्रिन्सिपल सुरेखा पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी असिस्टंट प्राध्यापक ज्योती वाघ सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी, जळगाव या प्रमुख पाहुणे म्हणून तर योग शिक्षक देवयानी महाजन, कृष्णा महाजन,तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शिबिरा प्रसंगी योगशिक्षक देवयानी महाजन, प्रमुख पाहुण्या प्राध्यापक ज्योती वाघ व अध्यक्ष सुरेखा पाटील यांनी योग साधना चे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सदर योग साधना शिबिर 27 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नासिक यांच्या अंतर्गत योग शिक्षक डिप्लोमा या अभ्यासक्रमासाठी आयोजित 7 दिवसीय योग साधना शिबिरासाठी डॉ देवानंद सोनार मार्गदर्शक प्रा गीतांजली भंगाळे, प्रा पंकज खाजबागे योगशिक्षक देवयानी महाजन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

टीम झुंजार