भावांशी शेतातील हिस्से वाटणीवरून मनात राग असलेल्या ५५ वर्षीय इसमाचा रेल्‍वेखाली उडी मारून केली आत्महत्या.

Spread the love

आत्महत्येपूर्वी शालकास केला होता फोन.

जळगाव : शहरातील कासमवाडी येथे राहणाऱ्या एका रिक्षा चालकाने शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.

संजय चावदस सपकाळे (वय-५५, रा. कुवारखेडा ता. जळगाव ह.मु. कासमवाडी जळगाव) हे पत्नी व मुलीसोबत वास्तव्याला होते. रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतातील हिस्से वाटणीवरून पाच भावांमध्ये वाद सुरू होता. इतर भावांना शेतातील वाटेहिस्से देण्यात आले होते. परंतु संजय सपकाळे यांना शेतातील कुठलाही हिस्सा देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे माझा हिस्सा मिळावा या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून ते भावांशी भांडण होते.

शालकाला केला फोन. दरम्‍यान मंगळवारी (२३ मे) सकाळी शेतीच्या हिस्से वाटेवरून पुन्‍हा वाद झाला. त्यावेळी भाऊ यांनी शेती देण्यास नकार केला. या संतापाच्या भरात संजय सपकाळे यांनी आसोदा रेल्वे फाट्याजवळ रिक्षा बाजूला लावून शालक गजानन आधार सोनवणे यांना फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगत धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी आसोदा रेल्वेगेटजवळ धाव घेतली होती. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रघुनाथ महाजन यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला.

हे पण वाचा

टीम झुंजार