अमळनेर :- येथील मा नगरसेवक हाजी शेख मिस्तरी, सामाजिक कार्यकर्ते राजु अलाउद्दीन शेख,मा नगरसेवक फिरोज मिस्तरी, सैय्यद मुख्तार अली यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मेंदूज्वर लसीकरण शिबिर शहरातील कसाली मोहल्ला किल्ला चौक येथील अक्सा हाॅल मध्ये आयोजित करण्यात आले होते या शिबिरात अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगांव, शिरपूर येथील एकुण ९१ भाविकांनी लाभ घेतला
पवित्र हज यात्रेसाठी जाण्यासाठी मेंदूज्वर ची लस घेणे बंधनकारक असते हे लस नाही घेतली तर सौदी अरेबिया येथील जद्दा विमानतळ प्रवेश नाकारण्यात येतो ही लस जिल्हास्तरावर असते परंतु मागील काही वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे यांच्या प्रयत्नाने अमळनेर येथे शिबिर आयोजित करण्यात येतो आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविकांना सोयीचे होतो लसीकरण शिबिरात माजी आमदार साहेबराव पाटील, मा जि प सदस्य जयश्री ताई पाटील,सह आदिंनी भेट दिली डॉ ताडे, डॉ विलास महाजन,सह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळ देऊन अनमोल सहकार्य केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






