जळगाव :- जिल्ह्यातील यावल येथील आदीवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला भोजन ठेकेदाराकडून २० हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाई झालेल्या लाचखोर लेखापालचे नाव रविंद्र बी. जोशी असे आहे.
याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल शहरात आदिवासी एकात्मिक प्रकल्प विभागात आदीवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यात शासनाच्यावतीने मोफत शिक्षण व जेवनाची सोय केली जाते. यात जेवनासाठी व्यवस्था शासनातर्फे जरी असली तरी याबाबचा ठेका दिला जातो. तक्रारदाराची पत्नी चालवत असलेल्या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून २०२१-२०२२ वर्षात भोजन पुरवठा करण्यात आला होता.
त्यापोटी ७३ लाखांचे बिल मंजूर झाले मात्र काम करून देण्याच्या मोबदल्यात मंजूर बिलाच्या अर्धा टक्के अर्थात ३६ हजार ५००रुपयांची लाचेची मागणी आदीवासी प्रकल्प विभागातील लेखापाल रविंद्र बी. जोशी याने केली.तडजोडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, याबाबत ठेकदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी २६ मे रोजी सापळा रचून लेखापाल याला २० हजार रूपयांची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाने पकडले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्यवेक्षण अधिकारी- श्री.शशिकांत पाटील,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. सापळा व तपास अधिकारी- एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. सापळा पथक- पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. पो.कॉ.सचिन चाटे कारवाई मदत पथक- PI.संजोग बच्छाव, ला.प्र.वि.जळगाव स.फौ.दिनेशसिंग पाटील,स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे,पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४