साहित्य म्हणजे ग्रामीण भाषेतील मौखिक ओवी उखाणे गाणी होय- प्राचार्य तानसेन जगताप
भडगाव – (जाविद शेख) ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान, चालीरीती सण उत्सव यांच्यातील सहभाग होय. आदिवासी लग्न शेती कामकाज, कारागीर कलाकार देवदेवतांची यात्रा मेळे गावातील पारंपारिक आख्यायिका यांच्या भाषा व साहित्य नवी उर्जा निर्माण करतात नवलेखक कवी यांनी डोळसपणे निरीक्षण केल्यास नवसाहीत्य निर्माण होईल असे मार्गदर्शन पर विचार प्राचार्य तानसेन जगताप महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह यांनी व्यक्त केले महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भडगाव ची सर्वसाधारण सभा भडगाव येथील संस्कृती फाउंडेशन च्या सभागृहात संपन्न झाली.
यावेळी शाखेचे अध्यक्ष प्रा सुरेश कोळी अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पुण्याचे विभागीय कार्यवाह प्राचार्य तानसेन जगताप चाळीसगाव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभी आद्य कवी केशवसुत यांच्या प्रतिमेचे पूजन मानवराच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाखेचे कार्याध्यक्ष डॉ वाल्मीक अहिरे, कोषाध्यक्ष रमेश धनगर तसेच कवी वि ना बागुल, नथ्थू अहिरे, मनिषा पाटील, विकास पाटील, व्ही. गो. चौधरी केशवसुत ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष विजय देशपांडे, जागृती मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपक मराठे, डॉ. जे डी गोपाळ, कवयित्री मनिषा पाटील पत्रकार नरेंद्र पाटील, प्रा. भालेराव प्रा. कांबळे प्रथमेश खैरनार डि.बी.कोळी, सचिन पाटील, बी एन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ वाल्मीक अहिरे, यांनी केले. यावेळी शाखेच्या वार्षिक विविध उपक्रमांच्या धावता आढावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य तानसेन जगताप यांनी शाखेला विविध उपक्रमांसाठी मार्गदर्शन केले. तसेच नूतन कार्यकारणी निर्मितीसाठी काम करणार्या लोकांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन कवी रमेश धनगर यांनी तर आभार प्रदर्शन विनोद बागुल यांनी केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






