धरणगाव (प्रतिनिधी)
धरणगाव :- तालुक्यातील टोळी-बांभोरी येथील दुपारी शेतातच एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या संदर्भात अधिक असे की, दिपक रामकृष्ण पाटील (वय ४९, रा. बांभोरी ता. धरणगाव), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दीपक पाटील हे आज सकाळपासूनच भर उन्हात शेतात काम करत होते.
दुपारी शेतातच अचानक ते जागेवर कोसळले. त्यांना रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, उष्माघात सदृश्य लक्षणाने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धरणगाव पोलिसात योगेश सुभाष पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसात दिलेल्या खबरीमध्ये उष्माघाताने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दीपक पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






