धरणगाव कृषी उत्पन्न बाजार सभापतीपदी शिवसेनेच्या लताबाई पाटील तर उपसभापतीपदी भाजपाचे संजय पवार यांची बिनविरोध निवड.

Spread the love

धरणगाव l प्रतिनिधी. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या लताबाई गजानन पाटील तर उपसभापतीपदी भाजपाचे संजय पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दिनांक २६ मे रोजी दुपारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मार्केट च्या कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी भाजप, शिवसेना आणि संजय पवार गटातला प्रत्येकी एक एक वर्ष सभापती आणि उपसभापती पद दिले जाणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री यांच्या सहकार पॅनलच्या (शिवसेना शिंदे गट,भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस संजय पवार गट) गटाला १२ जागा तर महाविकास आघाडीला (ठाकरे गट, राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस देवकर गट)या गटाच्या ६ जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे साहजिकच पालकमंत्री यांच्या गटाची कृषी मार्केटवर एक हाती सत्ता मिळालेले होती.
नवनिर्वाचित सभापती लताबाई गजानन पाटील या धरणगाव तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष गजानन नाना पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून गजानन पाटील हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक आहेत त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या धर्मपत्नी लखाबाई पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागली असल्याचे बोलले जात आहे.

या बैठकीच्या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह. भाजपाचे पी सी पाटील,संजय पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, तालुका अध्यक्ष गजानन पाटील, रविंद्र चव्हाण,विलास महाजन,धिरेंद्र पुरभे,बाळू जाधव सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच सभापती लताबाई पाटील यांचे पती गजानन पाटील यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर धरून जल्लोष करीत विजयाचा आनंद साजरा केला यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो ठेका धरून नाचले.त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

चौकट…. यावेळी पालकमंत्री म्हणाले की दरवर्षी सभापतीपद व उपसभापती पद हे सहकार पॅनल चे आमचे सहकारी र्मित्र भारतीय जनता पार्टी, संजय पवार गट व शिवसेनेच्या उमेदवारांना मिळणार असून या माध्यमातून मी शेतकरींच्या हिताच्या दृष्टीने कृषी मार्केटला गत वैभव प्राप्त करून देणार असल्याचे सांगितले.

हे पण वाचा

  

—–मा.ना.गुलाबराव पाटील
पालकमंत्री जळगांव जिल्हा

टीम झुंजार